वृक्षारोपण करून केले अस्थिविसर्जन; अग्रवाल कुटुंबीयांचा स्तुत्य उपक्रम

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : येथील प्रसिद्ध व्यापारी संतोष विद्याराम अग्रवाल शेठ यांचे नुकतेच निधन झाले असून त्यांच्या संपूर्ण अग्रवाल कुटुंबीयांनी त्यांच्या अस्थिविसर्जन स्वतःच्या शेतामध्ये झाड लावून केले.

यामागे संपूर्ण अग्रवाल कुटुंबियाची एकच भूमिका आहे. सातत्याने वाढणारे जलप्रदूषण, पृथ्वीचा असमतोल प्रचंड वाढणारे ऊन, यामुळे भविष्यात येणारी पिढी धोक्यात आहे. त्यामुळे सर्वांनी झाडे लावणे गरजेचे
आहे. आपल्या परिवारातील जेष्ठाच्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली आहे. ती झाड मोठे झाल्यावर सावली फळ आणि त्यांची आठवण कायम देणार आहे. 

हीच भावना सर्वांनी उराशी बाळगून येणाऱ्या काळात अश्याच प्रकारे सर्वांनी पर्यावरणासाठी वृक्षारोपण करून अस्थिविसर्जन करावे अशी भावना रोहित अग्रवाल व कुटुंबीयांनी व्यक्त केली. 

याप्रसंगी रोहित संतोष अग्रवाल, नवीन अग्रवाल, सचिन अग्रवाल, निश्चय अग्रवाल, वृक्षवल्ली टीमचे डॉ. शेखर दौड, डॉ. सचिन सोळंके, विजय वानखेडे, अभय वाघ, विशाल जाधव, डॉ. राहुल पालोदकर, अभिषेक काळे, डॉ. दिनेश साळवे, सिद्धार्थ साळवे, संतोष गाडेकर, सुदाम सुडके, गोलू कटरिया, अकील भैय्या, अतिश ताठे, रामू सोन्ने ई सर्वजण उपस्थित होते.